Bima Sakhi Yojana Marathi News:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ तारखेला हरियाणातून ही योजना लॉन्च केली आहे..विमा सखी ही योजना एलआयसी द्वारे राबविण्यात येत आहे..ही योजना महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
जाणून घ्या काय आहे बिमा सखी योजना ?
या योजनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखो महिलांना बीमा एजंट किंवा विमा सखी बनविण्याची मोहीम सुरू केली आहे ते म्हणाले की आता महिला विम्यासारख्या क्षेत्राच्या विस्ताराचे नेतृत्व करतील. या योजनेअंतर्गत दोन लाख महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष असल्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.. दहावी पूर्ण केलेल्या मुलींना/महिलांना विमा सखी योजनेअंतर्गत प्रशिक्षण देऊन तीन वर्षांसाठी आर्थिक मदत केली जाईल .. विमा क्षेत्राशी संबंधित माहितीचा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की एक LIC एजंट दरमहा सरासरी 15000 रुपये कमवितो, तर आमच्या विमा सखी दरवर्षी पावणे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रुपये कमावतील, यामुळे त्यांच्या कुटुंबाला अतिरिक्त उत्पन्न मिळेल.व महिला सशक्तीकरण होईल. या योजनेअंतर्गत पंचवीस हजार महिलांची (25000) विमा सखी म्हणून निवड करण्यात येईल. म्हणजेच 25000 महिलांना इन्शुरन्स एजंट बनवण्यात येईल.. यामुळे इन्शुरन्स चे महत्व वाढेल जेणेकरून इन्शुरन्स एजंट वाढल्यामुळे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतील व इन्शुरन्स चे महत्व अधिक लोकांना समजावू शकतील त्यामुळे अधिक प्रमाणात लोक इन्शुरन्स घेतील..
विमा सखी बनण्यासाठी पात्रता काय पाहिजे ?
- या योजनेचा लाभ केवळ महिलाच घेऊ शकता.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला दहावी पास असणे आवश्यक आहे.
- तसेच महिलांचे वय 18 ते 70 वयोगटातील पाहिजे.
- तीन वर्षाची ट्रेनिंग झाल्यानंतर या महिला LIC एजंट च्या स्वरूपात काम करू शकतील..
विमा सखींना किती पैसे मिळणार:
प्रत्येक विमा सखीला तीन वर्षाची ट्रेनिंग देण्यात येणार आहे त्यात त्यांना ट्रेनिंग सोबत स्टायपेंड देण्यात येणार आहे. ट्रेनिंगच्या तीन वर्षांमधील पहिल्या वर्षातील प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये (7000 RS) आणि दुसऱ्या वर्षातील प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये स्टायपेंड (6000) आणि तिसऱ्या वर्षात प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये स्टायपेंड (5000) देण्यात येणार आहे. या योजनेत पुढील तीन वर्षात दोन लाख विमा सखींना जोडण्याचे सरकारचे ध्येय आहे..
विमा सखी साठी अर्ज कसा कराल ?
विमा सखी रजिस्ट्रेशन :
विमा सखी रजिस्ट्रेशन साठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता . licindia.in या वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला click here for Bima Sakhi असे दिसेल..त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती भरून अर्ज करू शकता.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता;