1 Jul 2025, Tue

2024 च्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा: Happy International Mens Day

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2024:19 नोव्हेंबर ; International Mens Day 2024 : 19 november

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे आपल्या सोबत उभे राहणाऱ्या त्या प्रत्येक पुरुषासाठी हा दिवस साजरा केला जातो, मग तो पुरुष आपले वडील, पती, भाऊ, मित्र असू शकतात..

प्रत्येक पुरुषाचे समाज, त्याचे कुटुंब अशा अनेक क्षेत्रात योगदान असते, त्या योगदानासाठी हा दिवस साजरा केला जातो. सकारात्मक पुरुष आदर्शांना प्रोत्साहन देत असतात.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन  2024 ची थीम “Positive Male Role Models,”आहे. ही थीम पुरुषांच्या मानसिक आरोग्याविषयी चर्चा करण्यास आणि पुरुषांची भरभराट होऊ शकेल या मूल्यावर जोर देते.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन: इतिहास

त्रिनिदाद येथील विद्वान Dr. Jerome Teelucksingh, यांनी 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात केली. पुरुषांचे आरोग्य, सकारात्मक पुरुष आदर्शांचे मूल्य, लिंग-आधारित हिंसा यासारख्या महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधून पुरुषांच्या कर्तृत्वाचा आणि प्रतिभेचा गौरव करणारा दिवस स्थापन करणे हे त्याचे ध्येय होते.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2024 : wishes, greetings, quotes –

“खरे पुरुषत्व हे वर्चस्व नसून सर्वांना आदर आणि समानता दाखवण्यात आहे.”

“तुमचा दिवस प्रेम, आदर आणि आनंदाने भरलेला जावो. पुरुष दिनाच्या शुभेच्छा!”

माझ्या वडिलांना, माझ्या भावाला पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या सोबत उभ्या राहणाऱ्या माझ्या दादाला पुरुष दिनाच्या खूप शुभेच्छा.

माझ्या आयुष्याचे शिल्पकार, माझे आदर्श – माझ्या वडिलांना पुरुष दिनाच्या शुभेच्छा..

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थीचा हिंमतीने,कुशलतेने सामना करणाऱ्या पुरुषाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा

By Rishi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *