भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे ?
क्षेत्रफळानुसार भारतात राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
क्षेत्रफळानुसार भारतात राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र हे क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान – 342239 चौ किमी (sq.km) असून
मध्य प्रदेश – 308346 चौ किमी (sq.km)
आणि आपले महाराष्ट्र – 307713 चौ किमी (sq.km) आहे.
महाराष्ट्राने देशाचा 9.36% प्रदेश व्यापलेला आहे..
भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा हे आहे. गोवा या राज्याचे क्षेत्रफळ 3702 चौ.किमी (sq.km) आहे..