Ather 450X 2025 जाणून घ्या या गाडीचे नवे फिचर्स :
Ather कंपनीने आपली Ather 450X नुकतीच लॉन्च केली आहे, एथर एनर्जीने त्यांच्या सर्वात जुन्या इलेक्ट्रिक स्कूटर, ४५०एक्सची २०२५ ची आवृत्ती लाँच केली आहे. या गाडीत त्यांनी काही नवे फिचर्स समाविष्ट केले आहेत..जी या गाडीला वेगळी ओळख देते आहे. जाणून घ्या या फिचर्स बद्दल..
काय आहेत नवे फिचर्स ;
- या गाडीत Ather कंपनीने तीन नवे कंट्रोल मोड (Control mode) समाविष्ट केले आहेत
- शिवाय Ather कंपनीने या गाडीची बॅटरी रेंज (Battery range) देखील वाढविली आहे.
या स्कूटरमध्ये किंमतीत वाढ होण्यासोबतच अनेक बदल झाले आहेत. तीन नवीन कंट्रोल मोड चा समाविष्ट केलेला आहे. हे तीन नवीन मोड म्हणजे Rain, Road आणि Rally. नावांप्रमाणेच हे मोड वेगवेगळ्या पद्धतीचे फीचर्स देतात ज्यामुळे वेगवेगळ्या राइडिंग परिस्थितीसाठी गाडी योग्य बनते. हार्डवेअरच्या बाबतीत, ४५०X मध्ये एमआरएफ सोबत डेव्हलपड केलेल्या टायर्सचा एक नवीन सेटआहे. प्रो पॅक निवडणाऱ्यांना स्कूटरमध्ये नवीन एथरस्टॅक ६ सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड मिळेल. यात गुगल मॅप्स, अलेक्सा पेअरिंग, डॅशबोर्डवरील व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन, पिंग माय स्कूटर आणि लाईव्ह लोकेशन शेअरिंग, Call आणि music control सारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Ather 450X आणि Ather 450X Pro किंमत (Ather 450X Price and Ather 450X Pro Price)
2.9 kWh क्षमतेच्या व्हेरिएंटची किंमत आता 1.47 लाख रुपये आहे तर 3.7 kWh क्षमतेच्या व्हेरिएंटची किंमत 1.57 लाख रुपये आहे. दोन्ही किमती एक्स-शोरूम आहेत. या दोघांमध्ये pro version देखील आहे . 2.9 kWh मध्ये pro ची किंमत 17000 ने आणि 3.7 kWh मध्ये pro ची किंमत 20000 ने आधिक आहे.
Ather 450X Colours
या गाडीत 7 कलर्स आहेत. ब्लॅक, व्हाइट, स्पेस ग्रे, लुनार ग्रे, रेड, स्टिल्थ ब्ल्यू, हायपर सेंड.
हायपर सेंड आणि स्टिलथ ब्ल्यू हे या गाडीत नवे कलर आहेत.
Hyper sand, Stealth blue, True red, Lunar grey, Cosmic black, Space grey, Still white.. Highlighted colours are new in the scooter..
Ather 450X battery charging : 2.9 kWh व्हर्जन ला 0 ते 80% चार्जिंग होण्यासाठी 3 तास लागतील तर 3.7 kWh व्हर्जन ला 0 ते 80% चार्जिंग होण्यासाठी 4:30 तास लागतील..