काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे ? Kaziranga national park is famous for what ?
काझिरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
Kaziranga national park is famous for one horned rhino..
काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाबद्दल काही माहिती
काझिरंगा रिझर्व्ह फॉरेस्ट हे 1905 मध्ये तयार करण्यात आले..या रिझर्व्ह फॉरेस्ट चा एरिया एकूण 232 चौ.किमी. (sq.km) एवढा आहे. हे राष्ट्रीय उद्यान पूर्व हिमालयाच्या काठांवर आहे. या राष्ट्रीय उद्यानाला 1985 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्यात आले आहे. शिवाय बर्ड लाईफ इंटरनॅशनल द्वारे या राष्ट्रीय उद्यानाला पक्ष्यांसाठी महत्वाचे क्षेत्र म्हणून ही ओळखले गेले आहे.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यात आहे. हे राष्ट्रीय उद्यान दोन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे.. गोलाघाट आणि नागाव.
काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान केव्हा घोषित करण्यात आले ?
या रिझर्व्ह फॉरेस्ट ला 1968 मध्ये राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. आणि 2006 मध्ये या राष्ट्रीय उद्यानाला टायगर रिझर्व्ह घोषित करण्यात आले.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून कोणती नदी वाहते ?
या राष्ट्रीय उद्यानातून 3 नद्या वाहतात. मोरा दिफलू, दीफलू आणि मोरा धनसिरी
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात कोणते प्राणी आढळतात ? – वाघ, हत्ती, एशियाटिक वॉटर बफेलो हे सुद्धा या राष्ट्रीय उद्यानात आढळणारे काही मुख्य प्राणी आहेत.
पूर्ण जगात असलेल्या एक शिंगी गेंड्यांपैकी 90% गेंडे हे आपल्या भारतातील आसाम मधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात आहेत. या एक शिंगी गेंड्याचे IUCN स्टेटस vulnerable आहे. या मुळे हे उद्यान एवढे प्रसिद्ध आहे..
वर्ल्ड डॉक्युमेंटरी या you tube चॅनेल ने यावर एक उत्तम व्हिडिओ बनवली आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती व्हिडिओ बघू शकता
https://www.youtube.com/watch?v=ECgXrsK7EvU