महाकुंभ 2025 कुठे, कधी होणार, जाणून घ्या.. Mahakumbh 2025 date and place
उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे लवकरच महाकुंभचे आयोजन होणार आहे.. यावेळेसचे महाकुंभ हे विशेष आहे. कारण हे एक बृहत् महाकुंभ आहे जे 144 वर्षानंतर होते. या आर्टिकल मध्ये आपण महाकुंभ बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया ;
उत्तर प्रदेश सरकारकडून या महाकुंभाच्या आयोजनाला यशस्वी बनवण्यासाठी आणि प्रशासनाच्या योग्य कारभारासाठी एक वेगळ्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे त्या ठिकाणाला तात्पुरता एक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने महा कुंभक्षेत्राला नवा जिल्हा घोषित केला आहे. हा जिल्हा महाकुंभमेळा जिल्हा या नावाने आहे, हा उत्तर प्रदेशचा 76 वा जिल्हा आहे.
महाकुंभ विषयी माहिती जाणून घेऊया : महाकुंभ 2025 ;
महाकुंभमेळा हा जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक आहे.
कुंभमेळा हा भारतात चार जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जात असतो .
- प्रयागराज
- नाशिक
- हरिद्वार
- उज्जैन
आपण आधी कुंभमेळा विषयी माहिती जाणून घेऊया ;
पौराणिक कथांच्या अनुसार कुंभमेळ्याचा संबंध समुद्र मंथन सोबत आहे.
देव आणि राक्षसांनी मिळून अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केलं होतं तेव्हा अमृताचा कलश प्राप्त झाला होता.. अमृत कलश यामधून अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले होते ते या चार स्थानावर पडले होते म्हणजेच हरिद्वार, प्रयागराज, नासिक आणि उज्जैन.. या दिव्यस्थानांवर कुंभमेळा होण्याचे हेच कारण आहे. या चार दिव्यस्थळांपैकी प्रयागराजला एक विशेष महत्त्व दिले जाते.. त्याचे कारण असे आहे की हे स्थान तीर्थस्थळांचा राजा म्हणून ओळखले जाते. प्रयागराज ला तीर्थस्थळांचा राजा म्हटले जाते कारण ब्रह्मभगवान द्वारे पहिले यज्ञ येथेच केले गेले होते. आणि प्रयागराज हे तीन नदींचे संगम देखील आहे. या तीन नद्या म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती..
अन्य तीन कुंभमेळ्याचे स्थान ;
- हरिद्वार (गंगा नदीच्या किनारी)
- नासिक (गोदावरी नदीच्या किनारी)
- उज्जैन (शिप्रा नदीच्या किनारी)
कुंभाचे प्रकार
कुंभमेळा – कुंभमेळा हा बारा वर्षात चार वेळा आयोजित केला जातो.
अर्ध कुंभ मेळा – हरिद्वार आणि प्रयागराज मध्ये अर्ध कुंभमेळा प्रत्येक सहाव्या वर्षी आयोजित केला जातो.
पूर्ण कुंभ मेळा- पूर्ण कुंभ हे बारा वर्षात एकदा आयोजित केले जाते, हे फक्त प्रयागराज मध्येच आयोजित होते..
बृहत महाकुंभ – बृहत् महाकुंभ बारा पूर्ण महाकुंभ झाल्यावर म्हणजेच 144 वर्षांनी आयोजित केले जाते..
त्यामुळे यावर्षीचे महाकुंभ अत्यंत विशेष आहे व याची तयारी प्रयागराज येथे जोरात चालू आहे..
महाकुंभ मेळा 2025 तारीख – mahakumbh 2025 date, place
महाकुंभमेळा २०२५ चे आयोजन 13 जानेवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे.