एक देश एक निवडणूक या विधेयकाला (one nation one election bill) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे , पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. या आर्टिकल मध्ये आपण पुढील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
- एक देश एक निवडणूक म्हणजे काय ? What is One Nation One Election ?
- एक देश एक निवडणूक समिती : One Nation One Election Committee
- एक देश एक निवडणूक समिती अध्यक्ष :Who is the Head of One Nation One Election Committee ?
- एक देश एक निवडणुकीचे फायदे: one nation one election pros and cons
- एक देश एक निवडणुकीत येणारे चॅलेंजेस: one nation one election challenges
- या निवडणुकांसोबत महानगरपालिका आणि पंचायतींच्या पण निवडणुका होतील का ?
एक देश एक निवडणूक म्हणजे काय : One Nation One Election News
एक देश एक निवडणूक याचा अर्थ असा आहे की देशातील केंद्र सरकार आणि देशातील राज्य सरकारांच्या निवडणुका एका ठराविक कालावधीत एका वर्षात घेण्यात याव्या, हा ठराविक कालावधी चार-पाच महिन्यांचा असू शकतो किंवा त्याहून अधिक असू शकतो..आपल्या महाराष्ट्र राज्यात निवडणुका यावर्षी झाल्यात तसेच लोकसभेच्या निवडणुका याच वर्षी झाल्यात..पण प्रत्येक राज्यात असे नसते, काही राज्यात राज्याच्या निवडणुका एका वर्षात तर लोकसभेच्या निवडणुका दुसऱ्या वर्षात येतात. एक देश एक निवडणूक या कायद्यामुळे देशातील सर्व राज्यांच्या निवडणुका तसेच लोकसभेच्या निवडणुका या एकाच वर्षी घेतल्या जातील. अशाप्रकारे निवडणुका याआधीही घेतल्या गेल्या आहेत. 1952, 1957, 1962 आणि 1967 या वर्षात याच पद्धतीने एका वर्षात निवडणुका घेतलेल्या आहेत..
एक देश एक निवडणूक समिती : एक देश एक निवडणूक समिती अध्यक्ष : One Nation One Election Committee Head:
एक देश एक निवडणूक या विषयावर सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी एका समितीची नेमणूक केली होती. एक देश एक निवडणूक यासाठी माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे..
एक देश एक निवडणुकीचे फायदे : One Nation One Election Benefits :
आपल्या भारत देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका होत असतात यासाठी सरकारचे नेहमी निवडणुकांमध्ये लक्ष असते त्यामुळे बाकीच्या कामांकडे दुर्लक्ष होत असते. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे सरकारचा पैसा अधिक प्रमाणात खर्च होत असतो ..तसेच निवडणुकांसाठी लागणारी सुरक्षा यंत्रणा प्रत्येक वर्षी देशभरात हलवण्यात येणारा खर्च ही अधिक प्रमाणात असतो. तसेच वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते..महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार लक्ष केंद्रित करू शकत नाही..निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना ड्युटी लागत असते..त्यामुळे त्यांचे मूळ कामावरून दुर्लक्ष होत असते. एक देश एक निवडणूक या कायद्यामुळे देशात एकाच वर्षी निवडणुका झाल्यामुळे सरकारही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करू शकेल व गव्हर्मेंट ची कार्यक्षमता वाढेल. तसेच या विधेयकामुळे मतदानाची संख्या ही वाढू शकते. मतदान करणाऱ्यांना एकाच वर्षात मतदान करता येईल, त्यामुळे देशाचे प्रत्येक वर्षी मतदानाकडे लक्ष राहणार नाही व इतर महत्वाचे कामही लवकर होतील.
एक देश एक निवडणुकीत येणारे चॅलेंजेस: one nation one election challenges
एक देश एक निवडणूक यामुळे काही चॅलेंजेस ही समोर येणार आहेत. एकाच वर्षात लोकसभेच्या तसेच सर्व राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागेल तसेच सुरक्षा यंत्रणांना देशभरात निवडणुकांसाठी हलविणे एक चॅलेंज राहू शकते. पण एकाच वर्षात हे सर्व चॅलेंजेस पूर्ण केल्यावर सरकार नक्कीच अधिक कार्यक्षम बनू शकेल.
या निवडणुकांसोबत महानगरपालिका आणि पंचायतींच्या पण निवडणुका होतील का ?
एक देश एक निवडणूक यामुळे लोकसभा तसेच सर्व राज्यांच्या निवडणुका एक सोबत घेण्यात येताना यासोबत महानगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका घेण्याची शक्यता नाही आहे. पंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुका हा राज्य निवडणूक आयोगाचा विषय आहे.